Transcription
[संगीत] खुले आसमान सर्वांचे मुक्त व्यासपीठ सह्याद्रीचे ज्ञान विकास रंजकतेचे संस्कार संस्कृती [संगीत] परंपरेचे अस्मितेचा शृंगार मुनी स्नेह सखी सुखदायी सुखदायनी भेटे सपना सखे सखे सखे सखे [संगीत]
सह्याद्री हं नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी या उन्हाळ्यात आपण विविध पद्धतीने आपली स्वतःची काळजी घेत असतो आजारांना आपल्यापासून दूर ठेवत असतो पण मग या उन्हाळ्यात या मुखप्राण्यांची काळजी त्यांना न बोलता आपण कशी घेतली पाहिजे या उन्हापासून त्यांचं संरक्षण कसं केलं पाहिजे त्यांना होणाऱ्या आजारांपासून त्यांना कसं दूर ठेवलं पाहिजे या महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया आजचा आपला विषय आहे उन्हाळ्यातील पाळीव प्राण्यांची काळजी आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशीच तज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केली आहे आज आपल्या बरोबर आहेत पशुवैद्यक तज्ञ डॉक्टर वैभव पवार नमस्कार सर सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत डॉक्टर वैभव पवार यांचं पॉज अँड क्लॉज पेट कीर्ती क्लिनिक आहे माननीय राज्यमंत्री पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य उद्योग वस्त्र उद्योग येथे ते विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आज आपण त्यांच्याकडूनच या उन्हाळ्यामध्ये आपल्या प्राण्यांची काळजी कशी घेतली पाहिजे त्यांना आजारापासून कसं दूर ठेवलं पाहिजे किंवा एकंदरीतच त्यांच्या आहाराची सुद्धा कशी काळजी घेतली पाहिजे या सगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 2498050 मोबाईल वरून डायल करताना 02 हा एसडी कोड आहे
आजचा आपला विषय काय आहे ते पुन्हा एकदा पाहूया आजचा आपला विषय आहे उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांची काळजी आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर वैभव पवार सर खूप महत्त्वाचा असा आणि खूप छान असा विषय आहे की उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांची काळजी म्हणजे एवढ्या उन्हाळ्यात आपण आपली स्वतःची काळजी खूप छान पद्धतीने घेत असू म्हणजे वरच्यावर पाणी पिणं किंवा आजारांपासून कसं दूर राहिलं पाहिजे हे तर आपण बघतोच पण मुखप्राणी असतात की ज्यांना खरंच बोलता येत नाही पण ते न बोलता आपण समजून त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे खरं तर असे बरेच पाळीव पशु पक्षी आहेत पशु आहेत की जे माणसांनी पाळले आणि ते पूर्ण तऱ्हेने हे आपल्यावर अवलंबून असतात पण त्याची उत्पत्ती मात्र जंगली पशुंपासूनच झालेली आहे मग मुळात असं काही आहे का की आपण कुठले पशु पाळले पाहिजेत नाही बेसिकली आपण बघायला गेलं तर म्हणजे भारताच्या क्लायमेटला सूट होणारे पक्षी आणि प्राणी हे इकडे कमी प्रमाणात पाळले जातात किंवा ते अलाऊड नाहीत पाळण्यासाठी तर बऱ्याचश्या अशी इतक्या क्रेजमुळे किंवा लोकांच्या बाकी गोष्टींमुळे बऱ्याचश्या लोकांनी बाहेरून प्राणी आणि पक्षी इकडे आणले हम्म तर त्यांना जनरली हवामान सूट होत नाही इकडचं कारण की इकडे हे जे आपण राहतो हा भारत हा ट्रॉपिकल कंट्रीज मध्ये मोडतो आहेत जसं सायबेरियन हस्की आहेत जे तिकडे बर्फामध्ये गाड्या ओढतात किंवा सेंट बर्नार्ड आहे जे तिकडे रेस्क्यू डॉग म्हणून वापर होतो त्यांचा जम्मण शेपड आहेत तर अशा बऱ्याचश्या ब्रीड आहेत पग आहे तर त्यांना हे क्लायमेट सूट होत नाही तर त्याच्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते बेसिकली आपल्या इथे आता 40 डिग्रीच्या पुढे तापमान गेले तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा वेळेस होतं की त्यांना हे सहन न झाल्यामुळे त्यांना उष्माघातामुळे बरेचशे प्राणी मरण पावतात बरं तर बऱ्याच वेळेस याच्यात महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की तुम्ही बेसिकली त्यांना बाहेर उन्हामध्ये घेऊन जाता कामा नये पण सर मला इथे अजून एक विचारायचं की जसं तुम्ही आता ह्या विविध डॉग म्हणजे कुत्र्यांच्या जा प्रजातींविषयी सांगितलं पण असे कुठले प्राणी आहेत का की ती पाळण्याची आपल्याला मुभा आहे म्हणजे सरळच आपल्याकडे भारतात जर तुम्ही बघितलं असेल तर एक मांजर हाई पाळली जाते कुत्रा आहे किंवा काही ठिकाणी पक्षांमध्ये बघितलं तर कबुतर किंवा बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही असं बघितलं तर ससाही पाळला जातो तर त्यात असं काही आहे का नाही बेसिकली लीगली जर बघितलं आपण तर आपण डॉग हा लीगली पाळू शकतो तर त्याच्यामध्ये मांजरही पाळतात बाकी जे प्राणी आहेत जसं झालं किंवा कासव झाले तर त्याला असं लीगली कुठलीही परमिशन नाहीये की तुम्ही पाळू शकता कारण की ते मांसाळलेले प्राणी नाहीयेत किंवा ते पाळीव प्राणी म्हणू शकत नाही आपण कारण की ते एक वाईल्ड वाईल्ड लाईफ मध्ये येतात वाईल्ड लाईफ शेड्युल मध्ये येतात तर बेसिकली तुम्हाला डॉग आणि कॅट पाळण्याची मुभा आहे आणि डॉग साठी मुंबई महानगरपालिका किंवा इतर ज्या राज्यातल्या महानगरपालिका आहेत तर ते स्पेशल तुम्हाला लायसन्स प्रोव्हाइड करतात जे लायसन्स दर एका वर्षाने रिन्यू होतं त्या लायसन्सचं महत्व म्हणजे की जेव्हा तुम्ही ते तुमच्या डॉगला प्रॉपर व्हॅक्सिनेट लसीकरण करून आणि त्याची प्रॉपर काळजी घेऊन जर तुम्ही घरात ठेवत असेल तरच तुम्हाला ते पाळण्यास परमिशन आहे अगदी खरं आहे म्हणजे आता कारण की बेसिकली त्या जो तुमच्या घरामध्ये डॉग आहे त्याच्यामुळे इतर कम्युनिटीला म्हणजे आजूबाजूला राहणाऱ्या परिसर आहे बाकीच्या लोकांना काही त्रास न होता तुम्ही ते ठेवू शकता म्हणून त्याच्यासाठी आहे पण जसं आता आपण छान बोलतोय की ह्या उष्णतेमुळे किंवा ह्या गर्मीमुळे गरम हवामानामुळे जसं आपल्याला त्रास होतो तसे ह्या पाळीव प्राण्यांना कोणता त्रास होतो त्याविषयी आपण बोलूया आधी एक फोन घेऊया प्रवीण केणी आपल्याशी बोलतायत मालाड वरून नमस्कार नमस्कार बोला प्रवीणजी हं अ माझ्याकडे एक महिन्यापूर्वीची मांजर आली हं हॅलो सर नमस्कार सर हा नमस्कार बोला माझ्या घरी महिन्यापूर्वी एक मांजर आली हं आणि तिला आता पिल्ल झाली चार बरोबर हा तर ती तुमचा प्रश्न सर विचारा प्रवीणजी हां बोला माझ्याकडे मांजर आली आणि तिला आता तिने आता चार पिल्ल दिलेली आहेत तर त्यांच्या आता कशी काळजी घ्यायची ती माझी पाळवी मांजर नाहीये बरोबर परंतु तिला आम्ही ठेवून घेतले ते पिल्ल झाली म्हणून बरं धन्यवाद प्रवीणजी जसं प्रवीणजीने सांगितलं की त्यांच्याकडे अशीच एक मांजर आली आणि तिला आता चार पिल्ल झाली आणि आपण असं बघू बहुतेक आपल्या महाराष्ट्रात भारतात बघू की बहुतेक ठिकाणी असेच मांजर आलेले मांजर किंवा असे प्राणी येतात आणि ते पाळले जातात पण त्यांची काळजी कशी घ्यायची हे आपल्याला माहिती पाहिजे काय सांगाल त्यांना तुम्ही बेसिकली आता ही मांजर जी आली आहे तुमच्याकडे तर तिला जे पिल्लं एक ते सव्वा महिन्यापर्यंत त्या आईच्या दुधावरतीच असणार आणि ती मांजर तुम्ही बाहेरही शोधू शकत नाही कारण की ती तुमच्यावरती आता डिपेंडंट आहे ठीक आहे त्या पिलांना पण बाहेर घेऊन जाऊ शकत नाही किंवा तुम्ही त्यांना बाहेर सोडूही शकत नाही कारण की या गर्मीमुळे ते सर्वाइव होऊ शकत नाही तर बेसिकली जोपर्यंत ते बाहेरचं म्हणजे जे कॅट फूड असतं किंवा बाहेरचं खाणं सुरू करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते घरातच ठेवावं लागणार तुम्ही त्यांना बाहेर कुठेही सोडू शकत नाही आणि हा आणि मोठं झाल्यानंतर तुम्ही त्या पिलांना बहुत खूप साऱ्या मुंबई आणि उपनगरांमध्ये एनजीओस आहेत ज्या सेवाभावी संस्था आहेत ज्या प्राण्यांसाठी काम करतात तर अडॉप्शन फेअर घेतले जातात मुंबईमध्ये जसे आता मागे बँड्रा मध्ये झाली परेल मध्ये झाली तर त्या अडॉप्शन फेअर मध्ये तुम्ही त्यांना तुमची नोंदणी करून त्यांना चांगलं एक कुटुंब देऊ शकता आणि त्यांना अडॉप्शन मध्ये देऊ शकता तुम्ही खूप छान असा हा एक उपक्रम आहे की अशा अडॉप्शन फेअर मध्ये जेव्हा आपल्याला जर ते प्राणी घरात म्हणजे तिथे असेच आलेले आहेत किंवा त्यांना ती मांजर नंतर पुढे द्यायची आहे तर तिला असं रस्त्यावर कुठेतरी हे करण्यापेक्षा ठेवण्यापेक्षा अडॉप्शन फेअर मध्ये देऊ शकतात वैभवजी गरम हवामानामुळे जसा आपल्याला खूप त्रास होतो तसं त्या पाळीव प्राण्यांनाही खूप त्रास होत असेल तो काय होतो नक्की कोणता त्रास बेसिकली आता मेन मुद्दा म्हणजे लोकांना बऱ्याच म्हणजे पाळीव प्राण्यांविषयी खूप कमी माहिती आहे आणि हा विषय खूप म्हणजे विचाराधीन नाही किंवा लोक त्याचं जास्त हे करत नाही तर मेनली अह जे डॉग आणि कॅट जे असतात त्यांना घामाच्या ग्रंथी नसतात तर आपण जसं बाहेर फिरतो आपल्याला घाम येतो आणि आपल्या बॉडीच टेंपरेचर रेग्युलेट होतं तसं डॉग आणि कॅट यांचं टेंपरेचर रेग्युलेट होण्यासाठी असला असा कुठलाही मेकॅनिझम त्यांच्या बॉडीमध्ये नसतो तर थोड्याफार प्रमाणामध्ये पॅन्टिंग करून म्हणजे ते पॅंटिंग करून जिभे जिभेनी सलायवा बाहेर एक्सक्रीट करून थोडंफार टेंपरेचर रेग्युलेट करतात आणि त्यांच्या फुटपॅड मध्ये काही थोडसं मेकॅनिझम असतं ज्याच्यामुळे त्यांचं टेंपरेचर मेंटेन करतात तर जसं ह्युमन इफेक्टिव्हली बॉडी टेंपरेचर उन्हात गेला थंडीत गेला तर मेंटेन करतो तो मेकॅनिझम थोडा पुअर असतो डॉग आणि कॅट्स मध्ये बेसिकली त्याच्यामुळे त्यांना तुम्ही एक्सट्रीम हिटला एक्सपोज करणं हे कधीही धोकादायक असतं त्याच्यामुळे तुम्ही हा मुद्दा खरंच खूप छान आहे आणि ह्याच्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे कारण आपल्या मुळात हे आहे की उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यायची आणि ह्या उन्हाचा त्रास त्यांना होतो तो कसा होतोय आणि कसा टाळायचा याविषयी आपण आधी बोलूया एक फोन आलाय तो आधी घेऊया अनिल आपल्याशी बोलतात औरंगाबाद वरून नमस्कार नमस्कार मी अनिल मुंगेकर बोलतोय नमस्कार पवार साहेब नमस्कार हे अ पाळीव प्राण्यांमध्ये संकरित जे प्राणी पाळले जातात उदाहरणार्थ कुत्रे किंवा जर्सी किंवा गाई तर यांची काळजी घेण्यासाठी अगदी कमी खर्चामध्ये काय काय उपाय करता येतील जे की शेतकरी किंवा सामान्य माणूस पण अफोर्ड करू शकेल धन्यवाद अनिल जी त्यांचा जो मुद्दा आहे खरं तर त्याच्यावर आपण सविस्तर पुढे बोलणारच आहोत पण त्याच्या आधी हा जो तुमचा एक मुद्दा चालू होता की हवामानामुळे पाळीव प्राण्यांना जे जे त्रास होतात त्याविषयी तुम्ही बोलत होता की त्यांना तशा काही ग्रंथी नसतात की घामाद्वारे बॉडी टेंपरेचर रेग्युलेट होईल होणार त्यांचं तर मग बेसिकली आपण त्यांना एकदम एक्सट्रीम हिटला किंवा एक्सट्रीम कोल्डला एक्सपोज करणं हे चुकीचं आहे म्हणजे आपल्यावरतीच तेवढी जबाबदारी आहे म्हणजे त्यांना एकदम उन्हामध्ये त्यांना तुम्ही एक्सरसाइज करू शकत नाही म्हणजे सूर्य सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी त्यांना बाहेर जे वॉक देतो तर ते अर्ली मॉर्निंग किंवा लेट नाईट ह्या ह्याच दरम्यान द्यायला हवा दुपारच्या वेळेस दिलं तर ते बऱ्याच वेळेस काय होतं पॅंटिंग करून त्यांची एक थ्रेशहोल्ड नंतर त्यांचं बॉडीची ती सिस्टीम कोलॅप्स होते आणि ते त्यांची बॉडी तेवढं टेंपरेचर डाऊन करू शकत नाही आणि ते कोलॅप्स होऊन इव्हन बरेचसे प्राणी आहेत जे मृत्युमुखी पडलेले आहेत या गोष्टींमुळे हं पण मग उन्हाळ्यात म्हणजे त्यांना ही जी उष्माघाताची लक्षणं म्हणजे आहेत ती नेमकी कशी ओळखायची आपण की त्यांना त्रास होतोय हा जनरली जेव्हा डॉग म्हणजे प्रॉपर हे जनरली तुम्ही उन्हात नेता किंवा ते खूप सारे एक्सरसाइज करतात गर्मी असते तेव्हा त्यांचं पॅंटिंग खूप जास्त वाढतं पॅंटिंग वाढतं त्यांना वॉमिट सारखं होतं त्याच्यानंतर कधी कधी लूज मोशन होतं ब्लड लूज मोशन होतं अंगावरती रेड कलरचे पॅचेस येतात ह्या सगळ्या गोष्टी खूप केअरफुली आपण हे करायला पाहिजे कारण की डॉग इतके एनर्जेटिक असतात तुम्ही सपोज त्याच्याबरोबर बॉल बरोबर खेळतायत तर तो त्या एनर्जीमध्ये तो सगळं विसरून जातो की त्याची बॉडी किती एक्झॉस्ट झाली आहे त्याच्या बॉडीला किती त्रास होतोय मग तो त्या त्या टेम्पोमध्ये तर त्याला लक्षात येत नाही पण ती कंडिशन एकदम सिच्युएशनच्या बाहेर गेल्यावरती ते एकदम कोलॅप्स होतात मग त्यावेळेस मालकाला सुद्धा समजत नाही आणि याच्याकडे त्याला तो पण स्वतःची बॉडी रिकव्हर करू शकत नाही तर अशा वेळेस जे मालक आहेत तर त्यांनी प्रत्येक थोड्या थोड्या गोष्टीवरती लक्ष ठेवायला पाहिजे पर्टिक्युलरली ह्या उन्हाळ्यामध्ये की थोडं काही समजा तो लिथार्जिक वाटतोय तो त्याचं बॅलन्स जातोय किंवा तो जास्त ओव्हर पेंटिंग करतोय त्याचे डोळे लाल झालेत तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी छोटे छोटे लक्षणं त्यांनी इग्नोर नाही करायला पाहिजे म्हणजे रोजचे आपले हे जे पाळीव प्राणी आहेत आपल्या घरातले त्या कुठलंही छोटं लक्षण असेल तर त्याला असं इग्नोर न करता ते त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे नाही का पण मग असं काही आहे का की ह्या हवामानामुळे बाधित होणाऱ्या प्राण्यांच्या काही प्रजाती आहेत म्हणजे ठराविक ह्याच प्राण्यांना त्रास होतो आणि आपल्याकडे काही स्लाईड ही आहेत का आणि हा सांगा हा ह्या पर्टिक्युलरली ब्रीड आहेत ज्या शॉर्ट नोज ब्रीड आहेत आपण त्याला ब्रॅकेस ब्रीड बोलतो त्याच्यामध्ये बेसिकली तुमचं पग आहे पिकनीज आहेत बुलडॉग आहेत तर बॉक्सर्स आहेत तर ह्या ब्रीडला जनरली ते जेव्हा खूप जास्त पॅंटिंग करतात तर त्यांचं रेस्पिरेटरी सिस्टीम एक थ्रेशहोल्ड पर्यंत पोहोचल्यानंतर त्यांचा हार्ट रेट कमी कमी व्हायला लागतो आणि ते त्यांना म्हणजे थोडक्यात कार्डियाक अरेस्ट म्हणू शकतात ते सडनली तुम्ही एखाद्या पगला एक 10-15 मिनिटं एक दुपारच्या एक वाजता 40 डिग्री मध्ये फिरवाल तर तो कोलॅप्स होऊन मरू शकतो अशी बरीच अशी उदाहरण आहेत आणि म्हणजे डॉक्टर वेटनरियांकडे नेण्या इतकाही टाईम त्यांच्याकडे नसतो बरोबर असं आहे पण हे फक्त ह्याच आपण असे कोणते प्राणी म्हणजे त्यांच्यामध्ये जमाती आहेत की ते सर्वाइव करू शकतात कुठल्याही कंडिशन मध्ये किंवा कुठल्याही वातावरणामध्ये या उन्हाळ्यात सुद्धा ओके म्हणजे अशा बेसिकली डॉग ही एक प्रजाती आहे की त्याच्यामध्ये बेसिकली त्यांचं जे हिट टॉलरन्स जे आहे ते खूप कमी आहे म्हणजे कुठलीही ब्रीड घ्या पण जनरली जे इंडियन डॉग्स आहेत जे मुघल हाउंड आहेत किंवा ज्या भारतातल्या ब्रीड आहेत तर त्या थोड्याफार प्रमाणामध्ये हे क्लायमेट सूट करू शकतात पण ज्या एकदम ज्या बर्फात राहणाऱ्या ब्रीड इकडे आज मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये आणल्या जातात तर त्यांचा हा थ्रेशोड खूप कमी आहे म्हणजे त्यांची जी उष्मा सहन करण्याची कॅपॅसिटी वगैरे आहे ती खूप कमी आहे त्याच्यामुळे त्यांना जास्त प्रमाणात त्रास होतो आणि वैभवजी मगाशी अनिल मुंगीकर यांनी जो प्रश्न विचारला होता की संकरित प्राणी किंवा गाई आणि गाईंचा जो वर्ग आहे ज्यांना आपण शेतकऱ्यांचा एक मित्र म्हणू शकतो की म्हशी वगैरे त्यांना कमी खर्चात त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे तसं आता आपण पाळीव प्राणी जेव्हा बोलतोय तसं आपण डॉग कुत्र्यांबद्दल बोलतो की त्यांची अशा अशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे पण हे प्राणी असे असतात की त्यांची मेहनतही खूप असते शेतामध्ये राबत असतात आणि ह्या उन्हाळ्यामध्ये त्यांची स्पेशल काळजी कशी घेऊन त्यांचा आहार कसा संतुलित ठेवला पाहिजे त्याविषयी सविस्तर सांगा यांनी एक प्रश्न विचारला की त्यांच्याकडे संकरित गाई आहेत म्हणजे होस्टन फ्रीजर होस्टन फ्रीजर ह्या संकरित गाई आणि ह्या गाईला हिट अजिबात सहन होत नाही तर बेसिकली आणि कमी खर्चात त्यांचं कशी व्यवस्था कराल की असा प्रश्न होता त्यांचा तर बेसिकली आपण भारतामध्ये गाई ह्या बांधून ठेवतो ते एकदम अतिशय चुकीचं आहे तुम्ही गाईसाठी एक कुंपण करा साधं एकदम कुंपण म्हणजे तुम्ही एक सात-आठ गाईंसाठी कुंपण कराल तर त्याचा खर्च एक सात ते आठ हजारा पर्यंत येईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाईला दूध जास्त देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं चारा वगैरे नसून सावली ही खूप महत्त्वाची असते ह्या गाईला हं बरोबर तर तुम्ही ती सावली कशी भेटेल म्हणजे तुमच्या शेतामध्ये एखादं झाड असेल तर झाडाच्या आजूबाजूला एक साधं एक आठ हजाराचं कुंपण मारा एक आपला पाईप असतो सिमेंटचा पाईप तो अर्धा कापा आणि तिथे कंटिन्यू त्याला आपण आपल्या भारतीय परंपरेनुसार आपण गाई बांधून ठेवतो आणि जेव्हा शेतकऱ्याला वेळ भेटतो तेव्हा तो येणार एक बादली पाणी देणार त्याला ही चुकीची पद्धत आहे गाईला हे कंटिन्यू पाणी तिकडे असलंच पाहिजे त्या जागी तर मग 24 तास पाणी जेव्हा गाईला तहान लागेल तेव्हा आपण ज्याप्रमाणे स्वतःला तहान लागल्यावरती पाणी पितो तसं आपण गाईंसाठी नाही करत जेव्हा आपल्याला वेळ असते तेव्हा आपण त्यांना पाणी देतो खरं आहे ते एकदम चुकीचं आहे तर त्या पद्धतीने ते हे करा त्याच्यानंतर 24 तास पाणी त्यांना थोडीशी सावली आणि चाऱ्याच्या वेळा ठरवलेल्या वेळा आणि चाऱ्यामध्ये पण तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये जे आता स्केअरसिटी आहे म्हणजे तुमच्याकडे आता पाण्याचं औरंगाबाद जिल्हा म्हणजे तिकडे पाण्याचं कमी म्हणजे एवढं हे नाहीये तर तुम्ही जेव्हा पावसाळ्यामध्ये एक किंवा किंवा दीड रुपये किलो मका असते त्यावेळेस ती मका घेऊन त्याला त्याचा मुरघाच बनवू शकता त्याला काहीही खर्च येत नाही आणि तो मुरघाच तुम्ही सहा ते आठ महिने निश्चिंतपणे वापरू शकता तर अशाप्रकारे म्हणजे बेसिकली तुम्ही जर गाईला फ्री सोडाल तर तिचा स्ट्रेस कमी होईल तिचं दूध वाढेल तिला पाणी आणि दुधामुळे जनरली 90% हे पाण्यात पाणीच असतं पाण्याचाच घटक असतो त्याच्यामुळे तुम्ही जेवढं जास्त गाई पाणी पिणार जेवढी स्ट्रेस कमी असणार तिला तेवढं मिल्क प्रोडक्शन तिचं डेफिनेटली वाढेल सर अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे आणि अजून आपल्याला बाकीच्या विषय म्हणजे म्हैस किंवा बाकी बैल वगैरे त्यांच्याविषयी अजून त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे याविषयी चर्चा करूया एक फोन आलाय तो आधी आपण घेऊया अर्जुन जाधव आपल्याशी बोलतात बीड वरून नमस्कार आमच्याकडे एक म्हैस आहे आणि ती चार दिवसांपूर्वी व्याली आणि ती काय होते चारा कमी खाते तर यासाठी काय करावं धन्यवाद अर्जुन तुमच्या प्रश्नाचे उत्तर आपण देणारच आहोत आणि अजूनही अशाच पद्धतीने पद्धतीने कशा पद्धतीने त्या प्राण्यांची काळजी घेऊन त्यांना आजारापासून दूर ठेवलं पाहिजे ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया सर आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोच आहोत पण जसं इतर वेळेला काही कार्यक्रमात आम्ही टिप्स देत असतो या वेळेला आजचे आपले हे जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्यासाठी काही टीप आहे का एखादी छान डॉग साठी एक टीप देतो जनरली आपण म्हणतो की जसं आपण घरातलं खातो तसं डॉगला पण आम्ही घरच्याच जेवण देतो पण बेसिक प्रिन्सिपल आपण बघायला गेलं ना तर डॉग जे पचनशक्ती किंवा त्याचे शरीरातली जी जडणघडण आहे तर ती आपल्या शरीरातल्या जडणघडणीपेक्षा पूर्णतः वेगळी आहे त्याच्यामुळे आपण जे आपल्या घरी खाणं बनवतो ते हे आपल्या रिक्वायरमेंट नुसार बनवतो तर डॉगची रिक्वायरमेंट वेगळी असल्यामुळे बरेचशे जण घरातलंच खाणं देतात त्यांनी बऱ्याचश्या गोष्टी हार्मफुल होऊ शकतात जसं एक उदाहरण देतो की चॉकलेट जे घरात रेडियली अवेलेबल असतं मुलं आपले खातात तर ते चान्सेस आहेत की डॉगला ते देऊ शकतात पण चॉकलेटमध्ये थायोब्रोमीन नावाचा एक घटक असतो त्याच्यामुळे डॉगला फिट्स येऊन तो मृत्युमुखी पडू शकतो थोडीही क्वांटिटी जर तुम्ही दिली तर त्याच्या वजनानुसार त्याला ते खूप जास्त होणार आणि तो कोलॅप्स होऊ शकतो हे मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे कारण अजाणतेपणे आपण त्याच्या प्रेमापोटीही त्यांना ते देत असतो अगदी खरं आहे सर विश्रांतीला जाण्यापूर्वी जसं औरंगाबाद वरून आणि अर्जुन जाधव यांचा बीड वरून पण जो कॉल होता तर एक त्यांची म्हैस चार महिन्यांपूर्वी व्याली आणि आता उन्हामुळे चार दिवसांपूर्वी चार दिवसांपूर्वी आणि उन्हामुळे ती चारा आता कमी खाते तर काय करता येईल जनरली एक हिस्ट्रेस ही एक गोष्ट असते की त्याच्यामुळे प्रत्येक पाळीव प्राण्यांचं कुत्रा झाला मांजर झाली किंवा गाय झाली म्हैस झाली त्यांची एक भूक कमी होते आणि ही चार दिवसांपूर्वी व्यायली आहे तर कदाचित तिला एक मिल्क फिवर नावाचा आजार असतो तर त्या मिल्क फिवरमुळे त्यांचं बॉडीतलं कॅल्शियम कमी होऊन त्यांना विकनेस येतो तर ते कारण असू शकतं तर त्यांनी पशुवैद्यकांना दाखवणं गरजेचं आहे तिचं तिला काही ताप आहे का तिची वैद्यकीय चाचणी करणं हे महत्वाचं आहे कारण शोधणं महत्वाचं आहे बरं आपला एक पुढचा एक फोन घेऊया भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवली वरून नमस्कार आपण सखीमध्ये एक छान फोटो दाखवला त्यामध्ये दोन कुत्र्याची पिल्लं आणि मांजर होती त्याच्यावर आधारित माझा प्रश्न असा आहे सर की मुंबई सारख्या शहरामध्ये फ्लॅट संस्कृतीमध्ये साधारणतः कुत्र्याची पिल्ल किंवा मांदाची पिल्लं पाहण्याची किंवा आवड म्हणून शक्यता असते वगैरे आहे तर माझा प्रश्न असा आहे की यांना साधारणतः उन्हाळ्यामध्ये कुठल्या प्रकारे चा त्रास होऊ नये म्हणून यांना कुठला पूरक आहार आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे कदाचित हे प्राणी उन्हाळ्यामध्ये आजारी पण पडू शकतात तर त्यामुळे आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना काही संसर्ग होऊ शकतो का त्यावर काय विलाज आहे यावर आपण प्रकाश टाकावा धन्यवाद धन्यवाद भारत जी खूप छान असा त्यांचा प्रश्न होता की काही वेळेला आपली आवड म्हणून पाळली जाते तर आता त्यांची खाण्यामध्ये काही विशेष काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही एक भीती असते की बऱ्याचदा असंही म्हटलं जातं की कुत्र्यांचे किंवा मांजरांचे केस घरात पडतात इथं आणि त्याच्यामुळेही आपल्याला आजार होतात तर ही पण माहिती कितपत खरी आहे आता यांनी म्हटलंय की मुंबई मधल्या फ्लॅट संस्कृतीमध्ये ते डॉग वगैरे पाळतात पाळीव प्राणी जे काय ते तर आपल्याकडे ब्रीडचं एक क्लासिफिकेशन आहे म्हणजे तुम्ही घरी पाळायच्या ब्रीड कोणत्या जर तुमचं फार्म हाऊस आहे किंवा बंगला आहे तर त्याच्यामध्ये पाळायच्या ब्रीड कोणत्या किंवा तुमच्या समजा काही त्याला वर त्याचं क्लासिफिकेशन असं आहे टॉय ब्रीड जे आपण घरी पाहतो टाळू शकतो की जे आकाराने छोट्या असतात त्यांची जी एक्सरसाइज आहे ती घरातल्या तेवढ्या जागेमध्ये ते फिरले तर त्यांचा पूर्ण व्यायाम वगैरे होतो दुसरे आहे वर्किंग डॉग तर वर्किंग डॉग मध्ये तुमचे येतात लॅब्रडॉर जर्मन शेफर्ड जे कम्पेरेटिव्हली थोडे मोठे असतात म्हणजे 20 30 40 kg पर्यंत तर त्यांच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो म्हणजे सकाळी एक्सरसाइजला खाली नेणं किंवा त्यांची प्रॉपर एक्सरसाइज घरामध्ये होत नाही त्यांना आउटडोर एक्सरसाइज द्यावी लागते तर मेन म्हणजे बेसिकली जे फ्लॅट मध्ये राहतात मुंबईमध्ये छोट्या छोट्या फ्लॅट्स मध्ये राहतात तर त्यांच्यासाठी ऑप्शन आहे की तुम्ही टॉय ब्रीड साठी जा तर आपल्याकडे एक किलो पासून शंभर किलो पर्यंतचे डॉग अवेलेबल आहेत एक दीड किलोचा चुवा म्हणून एक छोटासा पॉकेट डॉग बोलतो आपण त्याला तो तुम्ही पाळू शकता आणि खायचं संदर्भात झालं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही जे आपण खातो म्हणजे आपला जो आहार आहे तो हा कुत्र्याचा आहार नाहीये म्हणजे आपण आपल्या घरात जो आहार बनवतो तो माणसाचा बनवतो तो कुत्र्याचा बनवत नाही एक तुम्हाला मला इथे प्रश्न विचारावासा वाटतो की बऱ्याच आपल्या प्रेक्षकांच्या मनात शंका असेल जे प्राणीप्रेमी आहेत जसं तुम्ही सांगितलं की आपला आहार कुत्र्याचा आहार नसतो पण बऱ्याच वेळेला घरामध्ये आपण भात किंवा चपाती खातो तसं ताट आपल्याप्रमाणे त्यांनाही दिलं जातं हे चुकीचं आहे का म्हणजे किंवा त्याचा त्यांना काही त्रास होतो का बऱ्याचश्या गोष्टी आहेत की ज्या डॉग खाऊ शकतात पण बेसिकली आपण बघायला गेलं तर दूध दूध म्हणजे कॉमनली म्हणजे मी लहान असतानी पण मला कोणी विचारलं तर कुत्रा काय पितो तर दूध हा ते चुकीचं आहे दुधामध्ये एक लॅक्टोज नावाची शुगर असते तर ती शुगर साठी जे आपल्या सलायवामध्ये ह्युमनच्या जे एन्झाइम्स असतात ते डॉग मध्ये अब्सेंट असतात मग आपण जेव्हा डॉगला दूध देतो तर ते शुगर तशीच अनडायजेस्टेड शुगर स्टमक मध्ये जाते त्यामुळे त्यांना लूज मोशन वॉमिट वगैरे बऱ्याच गोष्टी होऊ शकतात बेसिकली दूध हे डॉग मध्ये डायजेस्ट होत नाही त्यामुळे दूध हे डॉगला नाही दिलं पाहिजे त्याला लॅक्टोज इंटॉलरन्स असं म्हणतात नंतर काही धान्य जे आहेत म्हणजे बेसिकली तुम्ही एक गहू हे उदाहरण घ्याल तर त्याच्यामध्ये ग्लुटेन नावाचं एक प्रोटीन असतं त्याच्यान नावाच्या प्रोटीनमुळे बऱ्याचश्या स्किन ऍलर्जी वगैरे होऊ शकतात तर त्या स्किन ऍलर्जी मुळे आणखी जास्त त्रास होऊ शकतो तर बऱ्याचश्या डॉगला ते ग्लुटेन सूट होत नाही दॅट इज ग्लुटेन इनटॉलरन्स तर काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपण अवॉइड करू शकतो जे आपण खातो त्या डॉगला नाही द्यायला पाहिजे आणि आपण ज्या खातो त्या डॉगला चालणाऱ्या गोष्टींपैकी आहे की तुम्ही बॉईल्ड एग देऊ शकता तुम्ही भात देऊ शकता तुम्ही इडली वगैरे कधी देऊ शकता बोनलेस चिकन देऊ शकता बॉईल्ड बोनलेस चिकन त्याच्यामध्ये बाकी मसाले वगैरे ते न टाकता त्यांच्यासाठी सेपरेट किंवा मग सगळ्यात सोपं म्हणजे आता कमर्शियली डॉग फूड अवेलेबल आहे तो एक बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे मुंबईमध्ये बघितलं तर सगळेजण बिझी असतात तर डॉग फूड हा एक चांगला पर्याय आहे त्याच्यामुळे त्यांना संतुलित आहार भेटतो सगळ्या गोष्टी त्यांना भेटतात त्याच्यामुळे तो एक ऑप्शन आहे तर त्याच्यामुळे बाकी सगळा त्रास आणि त्यांना काही हानी ते सगळं कमी होऊ शकतं कमी होऊ शकतं वैभवजी मगाशी जो औरंगाबाद वरून एक कॉल होता आणि आपली चर्चा तेव्हा तशी चालूच होती की जसं तुम्ही गाईंविषयी सांगत होता कारण की शेतकऱ्यांचा आणि तो खूप महत्त्वाचा असा मुद्दा आहे तो मुद्दा आधी आपण इथे पूर्ण करूया की त्यांना तसं अ हवं तेव्हा 24 तास प्यायला पाणी उपलब्ध करून देणं आणि मोकळ्या एका कुंपणात सोडणं तसं मशीन विषयी पण असं काही आहे का की त्यांची ही एक दूध देण्याची
म्हणजे जास्त प्रक्रिया किंवा त्यांचाही आहार त्यांना संतुलित आणि अशा पद्धतीने त्यांनाही मोकळ्या कुंपणात ठेवण्याची गरज असते का? आपण म्हशीसाठी जसं गाईंसाठी मी तुम्हाला सांगितलं, तर मशीनसाठी सेम व्यवस्था आपण करू शकतो. तुम्ही एक कुंपण करून मी थोडंसं इलॉबरेट करून सांगतो. हा विषय खूप महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने. तर त्या त्या गोष्टींमध्ये तुम्हाला त्याचं शेण काढावं लागत नाही, आतमध्ये जावं लागत नाही. एक माणूस आठ ते 10 म्हशी दिवसातले फक्त दोन तास देऊन सांभाळू शकतो, त्याचे बाकीचे रुटीन काम करून. त्याच्यामध्ये मेन तुमचं चारा चाऱ्याचं नियोजन आलं. चाऱ्याचं नियोजन हे उन्हाळ्यामध्ये जेव्हा एक ते दीड रुपये किलो मका असते, हं, त्यावेळेस तुम्ही तो मुरघास बनवू शकता आणि तो पुढचे सहा ते सात महिने वापरू शकता.
अमेरिकेसारख्या देशांमध्ये सहा महिने बर्फ असतं आणि सहा महिने फक्त तिथे शेती होते. तरी पण तिकडचे जे मिल्क प्रोडक्टिव्हिटी आहे, म्हणजे जे गाया दूध देतात आणि बऱ्याचश्या लोकांची एक शंका असते, जसं त्यांनी विचारलं त्यांच्याकडे संकरित गाई आहेत, तर ती तिच्या म्हणजे त्यांना खरंच खूप जास्त त्रास असतो हिटचा. पण आपण प्रॉपर त्यांना व्हेंटिलेशन दिलं, प्रॉपर सावली दिली, तर तो त्रास कमी होऊ शकतो. आज महाराष्ट्रामध्ये संकरित गाई आहे आहे की जे ज्या 50 ते 60 l दिवसाला दूध देतात, त्या गाई महाराष्ट्रामध्ये आज आहेत. तर त्यांच्यासाठी 24 तास पाणी उपलब्ध करून फक्त तुम्ही एवढा जरी प्रयोग केला ना, तुम्ही एक साधा पाईप जो असतो सिमेंटचा तो कापून फक्त ठेवला, त्याला काही खर्च येत नाही आणि 24 तास जर त्यांना पाणी दिलं आणि त्यांना मोकळं सोडलं, म्हणजे त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते जाऊन पाणी पिणार. त्याच्यामुळे त्यांचा स्ट्रेस कमी होईल आणि एका गाई मागे नक्कीच त्यांचं एक 10% दूध उत्पादन वाढेल.
आणि चाऱ्याच्या नियोजनामध्ये तुम्ही जे बाहेर चरायला सोडतात गायांना वगैरे, तर बऱ्याच वेळेस काय होतं जी दुधा साठी एनर्जी लागते, तर ती बरीचशी एनर्जी त्यांची चालण्यामध्ये आणि इतरत्र खर्च होते. मग त्यामुळे दूध होण्यासाठी त्यांना कमी जीवनसत्व राहतात बॉडीमध्ये. तर त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना एक मुक्त गोटा, मुक्त गोठा पद्धती म्हणतात संकल्पना. आपण संकल्पना आहे, खूप सुंदर संकल्पना आणि म्हणजे कमी खर्चामध्ये हा जर प्रयोग करून बघितला, तर नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना चा खरंच खूप फायदा होईल.
अ मला माझा पुढचा मुद्दा असा आहे की उष्माघातामुळे आपण घरच्या घरी प्राथमिक उपचार काय करू शकतो? म्हणजे या सगळ्या पाळीव प्राण्यांसाठी जेव्हा त्याच्या मालकाला उष्माघाताची थोडीही लक्षणं दिसतील, म्हणजे तो समजा बाहेर घरच्या घरी म्हणण्यापेक्षा जिकडे त्याला उष्माघाताची लक्षणं दिसतील, सपोज तुम्ही त्याला बाहेर वॉकिंगला नेलेलं आहे, समजा रस्त्यावरती. उष्माघाताची लक्षणं दिसल्यावरती प्रथम त्यांनी त्या डॉग एक चांगली सावली शोधून त्या डॉगला, डॉग किंवा जो ॲनिमल असेल त्याला सावलीमध्ये न्यायला हवं. त्याच्यानंतर सोबत ते पाण्याची थोडी थंड पाण्याची बॉटल कॅरी करायला हवी. ती बॉटल त्याच्या डोक्यावरती किंवा अंगावरती थोडंसं स्प्रे करायला हवं आणि त्याला थोडं पाणी प्यायला द्यायला हवं. ही सगळ्यात प्राथमिक लक्षणं आणि डिपेंड ऑन द सिव्हिअरिटी, म्हणजे त्याला किती आहे, तो पूर्ण कोलॅप्स झाला आहे का किंवा काय आहे. तसं मग ते करून थोडे लक्षणं व्यवस्थित झाल्यानंतर त्याला तात्काळ पशुवैद्यकाकडे नेणं आवश्यक आहे, गरजेचं आहे.
पण असं मी म्हणेल की उन्हाळ्यातच नाही, पण इतर वेळेला जसं माणसांचे मूड असतात वेगवेगळे, तसे आपल्या ह्या प्राण्यांचे पण काही मूड असतात का? बरे एकदम अगदी बरोबर आहे की जेव्हा तुम्ही बरेचशे प्राणी जे असतात, जेव्हा तुम्ही बाहेर निघता घरातून जाण्यासाठी, तर तेव्हा प्राणी हे घरातून बऱ्याच डॉगला जाऊन डॉग हे ओनरला जाऊन देत नाही. त्यांची पॅन्ट खेचत बसतात. अशाही बऱ्याचश्या गोष्टी असतात. म्हणजे जेव्हा एखादा त्याचा मालक जवळ आलाय 1 km, तर त्या डॉगला तेवढं सेन्सेशन होतं. हा आणि समजा एखादं तो ओरडलाय, समजा एखादा मालक ओरडला, चल रे आज तू मला खूप त्रास दिलास, चल आणि एखादा फटका दिला, तो डॉग रुसून बसणार. म्हणजे हे सगळे इमोशन्स जे असतात ना, ते स्वतः जे कोणी डॉग स्वतः ज्यांनी पाळलाय, तोच सांगू शकतो. कारण की बरेचशे लोक असतात की जे बाजूच्या घरात डॉग आहे म्हणून ते स्वतःच्या घरी पाळतात, तर त्याला महत्व नाही. तुम्ही जेव्हा स्वतः तुम्हाला थोडाफार इंटरेस्ट आहे डॉग मध्ये आणि तुम्ही त्याला हे कराल, पाळाल, तर तुम्ही एन्जॉय करू शकता. अगदी खरं आहे. खूप छान. म्हणजे जसे आपले मूड असतात वेगवेगळे, तसे त्यांचेही मूड असतात आणि ते सगळे सांभाळणं ही त्यांची काळजी घेणे तितकंच महत्त्वाचं आहे.
चर्चा अशीच पुढे चालू ठेवी. सर चर्चेला सुरू करण्यापूर्वी आपली एक टीप जाणून घेण्यापूर्वी एक फोन घेऊया. संदीप कोळी आपल्याशी बोलतायत सोलापूर वरून. नमस्कार. नमस्कार. बोला. माझ्याकडे पॉमिलियन कुत्रा आहे. हं. त्याला खाण्यासाठी काय द्यावं? काय अवॉइड करावं? हं. अजून तो कुत्रा खूप तूप साखर असं खूप खातो. तो द्यायचं का अवॉइड करायचं? एवढं विचारायचं. बरं. धन्यवाद संदीप जी. वैभवजी त्यांना उत्तर देण्यापूर्वी आपली एक छानशी टिप्स होऊन जाऊ देत.
एक हा बेसिकली शेतकरी वर्ग जो आहे, हं, तर तो आपल्या गाईंना किंवा यांना खूप प्रेमाने सांभाळतो, सगळ्या गोष्टी करतो आणि सकाळी एक पाच साडेपाच ला उठून ते दूध काढायला जातात. हं, तर दूध काढताना काय करतात? म्हणजे झोपेतच असतात. आपण पण सकाळी झोपेत असताना ते दूध काढतात. काढतात आणि शेवटचं ज्याला स्ट्रीपिंग्स बोलतो आपण, लास्ट स्ट्रीपिंग्स, रेसिड्युअल मिल्क बोलतो, जे शेवटी ते तसंच राहतं. तर ते राहिल्यामुळे जी फॅट असते दुधातली, ती वरती राहते. ते ऑर्डर मध्ये ती तशीच राहते. त्यामुळे जो शेतकरी ते दूध जेव्हा डेअरी मध्ये घेऊन जातो, तर त्याचं नेहमी फॅट हे कमी भरत. तर माझं एकच आव्हान आहे सगळ्या ज्यांच्याकडे एक दहा जनावर आहेत, म्हणजे जे मिल्किंग ॲनिमल दहा आहेत, त्यांच्याकडे त्यांनी मिल्किंग मशीनचा वापर करा. त्यांच्या दुधाची फॅट वाढेल, प्लस कम्प्लीट मिल्किंग झाल्यामुळे गाई आणखी जास्त म्हणजे दूध उत्पन्न वाढेल आणि त्याची त्यांना जास्त नफा होईल. काहीही न करता एक्स्ट्रा काहीही न करता. कारण की आपण जे हाताने दूध काढतो, त्यांनी इथे स्तनाला इजा होऊ शकते आणि त्याचं फॅट परसेंटेज पण कमी होतं. पण त्या मिल्किंग मशीन मुळे त्याची क्षमता वाढू शकते. दूध दूध वाढणार, दुधाचं फॅट वाढणार, जे फॅट आपल्या नकळत चुकीमुळे ते आतमध्येच राहतं. हे म्हणजे खूप कॉमन प्रॉब्लेम आहे आणि बऱ्याच लोकांना हे माहित नाही की आपल्या गाईचं फॅट कमी का येतं. आपण जेव्हा डेअरी वरती ते दूध घालतो, तेव्हा खरंच खूप महत्त्वाचा असा एक मुद्दा आहे.
आता आपल्याला जो संदीप कोळींजीने जो प्रश्न विचारला होता की त्यांच्याकडे तो पमेलियन डॉग आहे, तर त्याला काय खायला द्यावं? काय देऊ नये? आणि त्याला तूप जास्त आवडतं, तूप साखर तूप, तर ते दिलेलं चांगलं आहे का? ओके. जनरली डॉग मध्ये आहे ना टेस्ट इतकी महत्त्वाची नसते. त्यांना टेक्सचर हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्ही एक उदाहरण द्यायचं झालं, तर आपला जो जेनेटिकली मॉडिफाईड टोमॅटो जो असतो, म्हणजे आपण त्याला हायब्रिड टोमॅटो म्हणतो, तर त्याच्यामध्ये फ्रॉकच्या थाय मसलचा जीन इन्कॉर्पोरेट केलाय. म्हणजे जेव्हा तुम्ही तो ओपन करता टोमॅटो, तर तो एक फ्लेश सारखा दिसतो, म्हणजे मांसासारखा दिसतो. तर तो आवडीने खातो. पण टोमॅटो हे डॉगला नाही द्यायला पाहिजे. आणि ओनर जे काही देतो, ते डॉग आवडीने खातो. ठीक आहे. तर बऱ्याचश्या गोष्टी ज्या असतात, कारण की माणसाशी जर कम्पॅरिझन कराल, तर माणसांमध्ये एक लाख टेस्ट बर्ड असतील, तर डॉग मध्ये फक्त 1000 असतात. म्हणजे तुम्ही त्याला काय खायला देता, त्याची चव त्याला जास्त काही कळत नाही. फक्त त्याचं जे टेक्सचर असतं, ते इम्पॉर्टंट आहे.
तर काय खायला देऊ शकता तुम्ही डॉगला? तुम्ही डॉगला बॉईल्ड बोनलेस चिकन देऊ शकता, विदाऊट मसाले. राईस देऊ शकता. उकडलेली अंडी देऊ शकता. काही डॉग उकडलेल्या फळभाज्या वगैरे खातात. आणि काय नाही द्यायला पाहिजे? तर कुठलेही सीड्स असलेली फ्रुट्स. हं, म्हणजे तुमचं कलिंगड झालं. हं, मोसंबी झालं. ह्या गोष्टी नाही द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर चिकन बोन्स झाले. चिकन बोन्स नाही द्यायला पाहिजे, कारण की चिकन बोन्स हे खूप शार्प असतात, तर त्याच्यामुळे त्यांच्या अन्ननलिकेला वगैरे इजा होऊ शकते. तर चिकन बोन्स वगैरे अवॉइड करायला पाहिजे. त्याच्यानंतर तर मिल्क अवॉइड करायला पाहिजे. त्याच्यानंतर साखर, जे गोड पदार्थ आहेत, ते अवॉइड करायला पाहिजेत. ओके. म्हणजे त्यांनी जे तूप आणि साखर सांगितलं, तर ते नाही द्यायला पाहिजे. दिलेलंच बरं. म्हणजे त्यांच्या मनातील शंका. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना काही न्यूट्रिटीव्ह असं काही भेटणार नाही. म्हणजे त्याचं पोट भरेल, पण त्याच्या म्हणजे न्यूट्रिटीव्ह होणार नाही. मग बरेचशे म्हणतात आमच्या डॉगचे केस गळतात भरपूर किंवा हे करतात, तर त्याला प्रॉपर न्यूट्रिशन न भेटल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला हे होतात. खरं आहे.
अ वैभवजी, या उष्ण हवामानात काय गोष्टी टाळायला पाहिजेत या प्राण्यांच्या बाबतीत? आपल्याकडे छान स्लाईड आहे. उष्ण हवामानामध्ये बेसिकली डॉगला कधी उन्हामध्ये बाहेर घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही. म्हणजे ते अवॉइड करायला पाहिजे. तुम्ही एक तर मी सांगितल्याप्रमाणे, एक तर अर्ली मॉर्निंग, म्हणजे सकाळी सहा वाजता वगैरे आणि लेट नाईट, अशा पद्धतीने तुम्ही न्यायला हवं. त्याच्यानंतर डॉगला सगळ्यात बेसिकली काय होतं की आपण डॉगला सोबत घेऊन कुठे मॉल मध्ये जातो किंवा एखाद्या दुकानामध्ये जातो, तर आणि त्याला कार मध्ये बंद करतो. हं, तर मी सांगितल्याप्रमाणे त्याला त्यांचं जे टेंपरेचर बॉडीचं टेंपरेचर मेंटेन करण्याची जी त्याच्यामध्ये हे असते मेकॅनिझम असतो, तो खूप वीक असतो डॉग मध्ये. म्हणजे डॉग सहजासहजी त्याच्या बॉडीचं जसं माणूस घाम येऊन त्याचं टेंपरेचर रेग्युलेट करू शकतो, तसं डॉग नाही करू शकत. तर तुम्ही त्याला गाडीमध्ये बंद करणार, भले काचा थोड्या उघड्या जरी असतील, बंद करणार आणि तुम्ही जाल, तर ते खूप चुकीचं आहे. आणि डॉगला दुपारच्या वेळेस, म्हणजे गार्डनमध्ये वगैरे किंवा तुम्ही एक्सरसाइज कराल किंवा मुलांबरोबर आज सुट्टी आहे सपोज. हं हं, तर खेळायला जाल, तर तुम्ही बॉल फेचिंग वगैरे एक्सरसाइज ज्या खूप हायली म्हणजे दमवणाऱ्या असतात, एनर्जी बेस्ट एनर्जी लागते, तर अशा वेळेस डॉग कोलॅप्स होऊ शकतात. त्याच्यामुळे एक्सरसाइज पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे. उन्हामध्ये डॉगला फिरवायला नेणं चुकीचं आहे आणि कार मध्ये त्याला लॉक करू नका.
ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या तर आपण बघूया. एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. माझे दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की जसं मनुष्याच्या आहारामध्ये भेसळ झालेली असते किंवा होऊ शकते, तशा प्रकारची भेसळ व्हायची शक्यता प्राण्यांच्या आहारात देखील असते का? आणि मग तसं असेल तर त्यासंबंधी काय काळजी घ्यावी? दुसरा प्रश्न असा आहे की अनेक लोकं कामानिमित्त किंवा फिरण्यानिमित्त बाहेर गेले जातात ज्यांच्याकडे प्राणी असतात. आता अशा पण सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या दिसतात की प्राण्यांसाठी देखील प्रोफेशनल हॉस्टेल निघालेले आहेत, वस्तीगृह निघाले आहेत. अशा हॉस्टेलमध्ये प्राण्यांचे आरोग्य, आहार, स्वच्छता या संबंधीच्या दक्षतेसंबंधी जे काही नियम असलेली नियमावली, आचारसंहिता असते का? धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी.
त्यांचे जे दोन प्रश्न आहेत, त्यांचा जो पहिला प्रश्न आहे की अ जसं आपल्या अन्नामध्ये भेसळ चालू असते, तसं त्यांच्याही अन्नामध्ये भेसळ होते का? म्हणजे असं काही तुम्हाला नाही. जे कमर्शियली अवेलेबल डॉग फूड आहेत, तर त्यांचे ते एफडीए च्या नॉर्म्स मधून स्ट्रिक्टली ते फॉलो केले जातात. पण बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे कधी कधी पॅकेटला एखादं पिन होल होतं किंवा कधी कधी एक्सपायरी पॅकेट आपल्याकडून बघितलं जात नाही. तर ती आपली इंडिव्हिजुअल स्वतःची जबाबदारी राहते की तुम्ही ओपन करून त्याचं काही स्मेल चेंज झालाय का? त्याच्यामध्ये आळ्या आहेत का? तर हे टेक्निकल गोष्टी आहेत. म्हणजे कुठे पंक्चर झाल्यामुळे वगैरे होऊ शकतं. पण अशा वेळेस तुम्ही त्याच्याकडे तुमच्याकडे हे आहे की तुम्ही पॅकेटच्या मागे त्यांचा हेल्पलाईन नंबर असतो आणि जर तुम्ही कंपनीला त्याचं रितसर तक्रार केली, तर त्याचं तुम्हाला पूर्ण कंपनसेशन दिलं जातं आणि किंवा ती बॅग तुम्हाला रिप्लेस करून दिली जाते. त्याच्यामुळे त्या भेसळ म्हणता येणार नाही त्याला, पण टेक्निकल गोष्टींमुळे फूड खराब होऊ शकतं. तर आपली जबाबदारी राहील की त्याची एक्सपायरी डेट आणि एकदा बॅग ओपन केल्यानंतर आतमध्ये एक्झामिनेशन आपण करायला पाहिजे. लगेच त्याला ते खायला न देता आपण इथे ते बघणं, एकदा बघणं गरजेचं आहे. गरजेचं आहे.
आणि त्याचा दुसरा जो प्रश्न होता की आता बरेचशे डॉग हॉस्टेल वगैरे असे निघालेले आहेत, जेव्हा आपण बाहेरगावी जातो, ती सोय आता उपलब्ध आहे, पण तिथे स्वच्छता, आहार, आरोग्य ह्याची काटेकोरपणे पाहणी केली जाते का? अशी कुठलीही आता सध्या अथॉरिटी नाहीये की जी याला गव्हर्न करणार करणारी एकही कोणतीही अथॉरिटी नाहीये. तर त्यासाठी तुम्ही स्वतः जाऊन बघणं किंवा बरेचशे आता हॉस्टेल्स आहेत की ज्याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत, तिथे तुम्ही 24 तास लक्ष देऊ शकता किंवा आपण पूर्व तिथे तपासणी केल्यानंतरच आपल्या प्राण्याला तिकडे सोडू शकतात. आणि बरेचशे आजार जे असतात ते होऊ शकतात या दरम्यान. तर त्याच्यासाठी एक टीप देतो मी तुम्हाला की तुम्ही पेट हॉस्टेलला किंवा कुठे ठेवाल, तर त्याच्या आधी तुम्ही एक टिक कंट्रोल आपल्या स्वतःच्या डॉगचं करायला पाहिजे, जेणेकरून तिकडच्या डॉग्सच्या टिक्स किंवा जे परजीवी असतात बॉडी वरचे, ते येणार नाही. आणि तुमचं वेळोवेळी तुम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून हे करतात. एक स्ट्रेस फॅक्टर असतो की ज्याच्यामुळे तुम्ही एक तुमच्यापासून तुमचा डॉग किंवा कॅट जेव्हा दूर राहतात, तेव्हा त्यांचं खाणं कमी होतं. खाणं कमी होतं आणि त्यांना स्ट्रेस मध्ये येतात. तर त्यांचे आजारी पडण्याचे चान्सेस असतात. पण तुम्ही ती म्हणजे तसं एक पेट फ्रेंडली आपण म्हणू शकतो त्याला, जिकडे असं हॉस्टेल आहे, म्हणजे त्या हॉस्टेलमध्ये त्यांना टाईम टू टाईम खाणं भेटतं का? तिथली हायजिन कशी आहे? त्याच्यानंतर पेट हॉस्टेलमध्ये तिकडे वर्किंग एरिया आहे का? म्हणजे तिकडे ते सगळी पाहणी खरंतर आपण स्वतःहून करणं, स्वतःहून करायला हवी आणि तिकडे त्यांना फिरण्यासाठी दोन टाईम जागा आहे का? ते सगळं ते सगळं बघणं, बघणं आपण स्वतःचं आहे. अगदी खरं आहे.
खरं तर हे पाळीव प्राणी जे आपण पाळतो, त्याच्या मागची भूमिका काय? नक्की उद्देश काय असतो? हे सुद्धा आपण सगळं समजून घेऊया. अ सर विश्रांतीला जाण्यापूर्वी आपली चर्चा सुरू होती, पण मुळात आपण हे जे पाळीव प्राणी पाळतो, त्याच्या मागची भूमिका काय असते आणि मुळात कोणत्या गोष्टींची गोष्टींची तपासणी करणं खूप गरजेचं असतं पाळीव प्राणी पाळताना? जनरली मुंबईतली किंवा कुठल्याही मेट्रोपॉलिटन सिटी मधली लाईफ इतकी स्ट्रेसफुल झाली आहे की लोकांना काहीतरी मनोरंजनाचे साधन म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि बरेचशे आजार आहेत, म्हणजे जे मानसिक आजार आहेत किंवा मेंटली जे डिसऑर्डेस्ट जे मुलं असतात, तर त्यांचे पुढची सडणघडण व्यवस्थित होण्यासाठी प्राणी ही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हे बऱ्याचश्या रिसर्च मध्ये पण हे प्रूव झालेलं आहे की प्राण्यांच्या सहवासात राहणारी मंदबुद्धी मुलं किंवा ज्यांना जे मेंटली रिटायर्ड आहेत, तर त्यांना खूप फायदा झालेला आहे या गोष्टींचा. तर या स्ट्रेसफुल लाईफ मध्ये पण कोणी पाळावं डॉग? ह्या पाळण्यासाठी आपण स्वतः एकदा होमवर्क करायला पाहिजे की आपल्या आपण का पाळतोय डॉग? तर आपल्या घरात सगळ्यांना आवड आहे की बाजूवाल्यांनी डॉग पाडलाय म्हणून आपण पाळतोय किंवा आपल्या मुलांना मुलगा म्हणतो नाही बाबा डॉग पाहिजे म्हणून आपण पाळतोय? तर घरामध्ये सगळ्यांना आवड पाहावी. त्याच्यानंतर सगळ्यांचे सहकार्य हवं त्याला. नाहीतर बऱ्याचश्या वेळेस काय होतं, बाजूवाल्याकडे डॉग आहे म्हणून लोक पाळतात, पण ते एक महिन्यापेक्षा जास्त पाळू शकत नाही. मग ते कुठेतरी देऊन टाकतात. तर आपण स्वतः सगळ्यांची आवड वगैरे लक्षात घेऊन मग ह्या गोष्टीकडे हे करायचं.
एक फोन घेऊया आधी आपण. शंकर अवसारीकर आपल्याशी बोलतात बोरेली वरून. नमस्कार. हॅलो नमस्कार. शंकरजी बोला. माझा प्रश्न माझा प्रश्न असा आहे की घरात घरात जे वायु प्राणी पारले पाळले जातात, जसं कुत्रा आणि मांजर, त्यांचे वेळोवेळी काही ठराविक सीजनला केस जातात, तर त्याच्यावर त्याचा काही आपल्याला घरातल्या लोकांना त्रास होतो का? आणि त्याच्यावर काय उपाय करावा? बरं. धन्यवाद शंकरी.
खरं तर हा जो प्रश्न आहे ना, डॉक्टर खूप लोकांच्या मनात असतो. म्हणजे जे कुत्रे किंवा पाळीव म्हणजे हे मांजर पाळत नाहीयेत, पण शेजाऱ्यांच्या घरात आहे, ते आपल्या घरात यासाठी कधी घेऊन येत नाही की त्याचे केस आपल्या घरात गळतात आणि त्यापासून काही आजार होऊ नये. हे कितपत खरं आहे आणि कसं हे दूर करता येईल? बेसिकली बघायला गेलं, तर केस म्हणजे हे एक टाईपचं प्रोटीन आहे, कॅरोटीन. तर त्याच्यामुळे केस पोटात गेले किंवा खाल्ले, तर त्याच्यापासून काही असा आजार होतो, हे साफ चुकीचं आहे. म्हणजे हे सगळं एकाकडून दुसरीकडे स्प्रेड झालेल्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये काय त्याला सायंटिफिक स्टॅन्ड नाहीये. तर हे चुकीचं आहे. म्हणजे तो केसांमुळे कुठलाही आजार होतो नाही. हा सपोज एखाद्या व्यक्तीला ऍलर्जी आहे ऑलरेडी, म्हणजे काहींना धुळीची ऍलर्जी असते, काहींना पराग कणांची ऍलर्जी असते, तसं काहींना केसांची ऍलर्जी असेल, तर ते फक्त ट्रिगर होऊ शकतं त्याच्यामुळे. पण बाकी असं काही मांजरीचे केस किंवा डॉगच्या केसांमुळे होत नाही.
आणि यांचा प्रश्न होता की काही सीजनल केस जातात का? हो, तर जनरली कसं आहे, जेव्हा क्लायमेट गरम होतं किंवा क्लायमेट थोडंफार चेंज होतं, तर हे जे शेडिंग असतं, दॅट इज रुटीन शेडिंग. शेडिंग तर त्याच्यामुळे केस जाऊ शकतात. पण आपल्या भारतामध्ये केस जाण्याचं, म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी केस जाण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे इथलं क्लायमेट हॉट आणि ह्युमिड क्लायमेटमुळे जनरली आद्रता जी असते हवामानातली, तर त्याच्यामुळे केस जाण्याचं प्रमाण खूप जास्त, म्हणजे वाढतं. वाढतं. हे क्लायमेटचं हे आहे दोष आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं न्यूट्रिशन. हं. केसांना आवश्यक असणारी तत्व. हं. हे त्या डॉगला न मिळाल्यामुळे केस जाण्याचं प्रमाण हे जास्त होतं. हं. किंवा बरेचशे आपण त्याचे जे परजीवी असतात, टिक्स असतात, फ्लीज असतात, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्यांना काही त्वचेचे आजार झालेले असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर त्याच्यामुळे पण केस हा केस जाणं हे बंद होऊ शकत नाही, पण कमी नक्कीच होऊ शकतं. कमी नक्कीच होऊ शकतं.
मला आता एक महत्त्वाचा असा प्रश्न विचारायचा आहे की आजचा विषय खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही खूप छान माहिती अशी देत आहात आणि आता बऱ्याचश्या घरांमध्ये हे पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा, मांजर किंवा हे सगळं पाळलं जातं आणि त्याच्याविषयी लोकांना माहिती असणे खूप गरजेचं असतं. पण ह्या हे जे क्षेत्र आहे आहे, पशुवैद्यक क्षेत्र, त्याच्याकडे तसा ओढा फार कमी होतो. म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, पण मला पशुवैद्यक डॉक्टर किंवा ह्या तज्ञ व्हायचंय. त्याच्यासाठी जर आपल्या काही मुलांना किंवा मुलींना पुढे यायचं असेल, तर काय आहे? त्याच्यासाठी काय करावं लागेल? नाही, तसं बघायला गेलं, तर पशुवैद्यकीय क्षेत्र आहे, म्हणजे बऱ्याच अपॉर्चुनिटी आहेत की ज्या आपण इकडे ऍडमिशन घेऊन करू शकतो. तुम्ही संशोधन, संशोधनात जाऊ शकता. तुम्ही स्वतःचं क्लिनिक टाकू शकता, कारण की आता मुंबई सारख्या किंवा कुठल्याही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये मध्ये जी पाळीव प्राण्यांची जी संख्या वाढत आहे, तर तेवढ्याच पटीने यांची डिमांड पण वाढत आहे वेटनरीची. त्याच्यामुळे गव्हर्मेंट क्षेत्रामध्ये खूप खूप अपॉर्चुनिटी आहेत की कारण की आपल्या भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे आपल्या इथे पशुपालनाला पण तितकंच महत्त्व दिलं जातं आणि पशुपालनासाठी पशुवैद्यक हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. बऱ्याचशा औषधांच्या कंपन्या आहेत की जिथे पशुवैद्यकांची आवश्यक आवश्यकता असते. त्याच्यानंतर बऱ्याचशा संशोधन संस्था आहेत, जिथे पहिले प्रयोग हे प्राण्यांवरती केले जातात आणि त्यानंतर प्री क्लिनिकल ट्रायल्स बोलतात त्याला, तर त्या क्षेत्रात तिथे पण पशुवैद्यकांची आवश्यकता.
मुळात असे काही व्यक्ती असतात किंवा मुलं असतात की ज्यांना ह्याची आवड असते. मुळात ते प्राणी प्रेमी असतात, पण ह्याच क्षेत्रात आपण जाऊन पुढे जाऊ शकतो, हा विचार जास्त होत नाही. बऱ्याचश्या आता संधी अशा उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही एक बारावी सायन्स केल्यानंतर, त्याच्या जी एंट्रन्स असते, नीट, हं, ती नीट देऊन तुम्ही महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी नागपूर, ही या युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करू शकतात. टोटल पाच कॉलेज आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबई, परभणी, उदगीर, शिरवळ आणि नागपूर. तर इकडे तुम्हाला ऍडमिशन घेऊ शकता तुम्ही. पाच वर्षाचा कोर्स आहे हा डिग्री. हं. त्याच्यानंतर दोन वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन. बरेच क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. न्यूट्रिशन आहे, फार्मकोलॉजी आहे, माझं जसं मेडिसिन मध्ये झालं, मेडिसिन आहे. सर, सर्जरी आहे. तर त्याच्यामुळे बऱ्याच संधी उपलब्ध आहेत.
आता त्याच्याच बरोबर, आता आपल्याकडे हा विषय खूप छान आहे. वेळेची कमतरता असते, पण आपण हे जे पाळीव प्राणी पाळतो, तर त्याच्यामध्ये त्यांचं लसीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्याची काही ठराविक अशी हे आहे की तीन महिने, सहा महिने किंवा वर्ष आणि त्याच्यात पुढचं मुलं असं आहे की हे जे आपल्या घरातले प्राणी आहेत, त्यांना कधी कधी सर्रास आईस्क्रीम किंवा आता आंब्यांचा सीजन आहे, तर आंबेही खायला दिले जातात किंवा कधी कधी घरामध्ये ह्या बाहेर उष्णता आहे, गर्मी आहे, तर एसी मध्ये ठेवलं जातं. हे सुद्धा त्यांना कितपत मानवणार आहे? आता हे एसी मध्ये ठेवलं जातं, म्हणजे एसी हे जनरली तुम्ही जर टेंपरेचर 26, 27 असं ठेवाल, तर ते प्लीज टेंपरेचर असतं. म्हणजे त्या टेंपरेचर मध्ये सगळ्यांची वर्क एफिशियन्सी वाढते. आपल्या बॉडीला जास्त कष्ट घ्यावे लागत नाही टेंपरेचर वरती खाली करण्या मेकॅनिझम साठी. तर त्याच्यामुळे एसी मध्ये तुम्ही ठेवू शकता, पण टेंपरेचर व्हेरिएशन मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही एकदम चिल्ड एसी मध्ये ठेवाल आणि त्याला एकदम एक्सट्रीम हिट मध्ये आणाल, तर तो मेकॅनिझम कमकुवत असल्यामुळे प्राण्यांमुळे त्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही एक प्लेझंट क्लायमेट ठेवू शकता दिवसभर, पण एकदम चिल्ड मधून एकदम गरम नाही आणू शकत.
आणि त्यांना जे खाण्याचा हा जो प्रकार आहे, कधी आईस्क्रीम किंवा काय, तर ह्या गोष्टी म्हणजे तो खातोय म्हणून त्याला देणं योग्य नाहीये. हा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डॉग खातो, पण त्याला चव जास्त कळत नसल्यामुळे. आपल्या प्रेमापोटी तुम्ही काहीही द्याल, तर तो खाणार. पण जनरली आईस्क्रीम जे आहे, तर तर प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम जे असते, तर ते थोडाफार प्रमाणात टॉयलेट करू शकता तुम्ही. वन्स इन अ वीक, ट्वाइस इन अ वीक देऊ शकता. त्यांना त्याची काही अडचण नाहीये. त्यानंतर मॅंगो, मॅंगो पण वन्स इन अ व्हाईल, पण तुम्ही आधी थोडंसं टेस्ट करून द्यायला पाहिजे की यामुळे त्याला ऍलर्जी होत नाहीये, त्याला पचनाचा काही त्रास होत नाहीये. हे शुअर झाल्यानंतर तुम्ही त्याला कधी थोडंफार तुमच्या सॅटिस्फेक्शन साठी त्याला देऊ शकता. त्याच्या नाही, त्याच्या नाही अजिबात नाही.
आणि जो लसीकरणाचा जो मुद्दा आहे, तर त्याची काही ठराविक वेळ आहे का अशी? लसीकरण हे वयाच्या 45 व्या दिवशी स्टार्ट होतं. डॉगचा एक कोर्स असतो चार ते पाच इंजेक्शन्सचा. त्याच्यानंतर वर्षातून एकदा असतो. आता या लसीकरणामुळे बरेचशे जे झुनोटिक आजार आहेत, म्हणजे प्राण्यांपासून माणसाला होणारे आजार, तर ते प्रिव्हेंट होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही सेफली प्राण्यांना स्वतः बरोबर ठेवू शकता, त्यांना हाताळू शकता किंवा त्या डॉग वगैरे चावल्यामुळे आपल्याला काही आजार होत नाही. तर त्यासाठी लसीकरण हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते शासनानेही कंपलसरी केलेलं आहे. जर तुम्ही डॉग किंवा कुठलाही पाळीव प्राणी घरी पाळतात, तर त्याचं लसीकरण कंपलसरी करून त्याचं कॉर्पोरेशन मधून, म्हणजे बीएमसी झालं, ठाणे महानगरपालिका झालं, त्या कॉर्पोरेशन मधून एक लायसन्स घेणं हे गरजेचं आहे. अगदी खरं आहे.
जाता जाता, आता आपला वेळ आपली वेळ झालेली आहे, पण जाता जाता सगळ्या प्राणी मित्रांसाठी काय सांगाल? प्राणी प्रेमींसाठी काय सांगाल? थोडक्यात. माझा एकच संदेश आहे की तुम्ही जर एखादा प्राणी घरी पाळता, हं, तर त्याचं तुमच्यावरती कधी बर्डन नाही झालं पाहिजे. तुम्ही त्याला कधीही एन्जॉय करता आलं पाहिजे तुम्हाला. तर त्या अनुषंगाने तुम्ही पाळा. अगदी खरं आहे. अजून एखादा महत्त्वाचा काही संदेश द्यायचा आहे का? आपल्या सगळ्या फॅमिलीसाठी किंवा ज्यांच्या घरात प्राणी आहेत? प्राणी म्हणजे प्राण्यांमुळे जे घरातलं वातावरण जे खेळीमेळीचं राहतं, सगळं राहतं, तर त्यासाठी प्राणी तुम्ही स्वतःही पाळा, दुसऱ्यालाही ज्यांना आवड आहे, त्यांना इनकरेज करा पाळण्यासाठी. फक्त एक प्रेस्टीज म्हणून पाळू नका, तर त्याला तेवढा जीव लावा, त्याला लळा लावा, तर तुम्हालाही त्याचा तेवढाच बेनिफिट भेटेल. ते खूप मोठं स्ट्रेस बस्टर आहे, तर त्या अनुषंगाने कडे बघायला पाहिजे. अगदी खरं.
खूप छान अशी माहिती आज आपण सरांकडून ऐकली की फक्त एक प्रेस्टीज म्हणून नाही, तर आपल्याला खरंच त्यांचा लळा आहे, प्रेम आहे म्हणून ते पाळा आणि त्यांना काय हवं नको ह्याची काळजी घ्या. आजचा विषय कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. कसा कळवायचा आहे, दोन्ही माध्यम तुम्हाला माहीतच आहेत. पण आजचा विषय झाला, तर उद्याचा आपला सखी सह्याद्रीचा विषय काय असेल, ते एकदा आपण जाणून घेऊया. उद्याचा आपला विषय आहे मराठी साहित्यातून संस्कार आणि संस्कृती. सहभागी आहेत श्री राहेरकर बाबा, महानुभाव संत साहित्य अभ्यासक, सातारा. तसेच आपले दुसरे गेस्ट आहेत पद्मावती जावळे, लेखिका, संत साहित्य अभ्यासिका. सर, आज तुम्ही इथे आलात आणि खरंच ही छान माहिती खूप छान सोप्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने आपली आवड त्यांच्यावर न लादता, नक्की त्यांना काय हवं याचा विचार केला गेला पाहिजे, हे आम्हाला सांगितलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
[संगीत]
[संगीत]
[संगीत]